IMG-LOGO
महाराष्ट्र

पुण्यात पावसाचा धुमाकूळ

Thursday, Oct 15
IMG

राज्यभरात परतीचा पाऊस हजेरी लावत आहे. येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

पुणे, दि. १५ ऑक्टोबर : राज्यात परतीच्या पावसामुळे अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाचा तडाखा बसला आहे. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे. राज्यभरात परतीचा पाऊस हजेरी लावत आहे. येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गेल्या काही तासात मुंबईत तुफान पाऊस बरसत असल्याने सायन पोलीस स्थानक, किंग्स सर्कल, हिंदमाता आणि परळमधील सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता पावासाचा जोर काहीसा ओसरला असला तरीही पुढील काही तास पुन्हा जोरदार सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुण्यात सिहंगड रस्ता, विश्रांती नगर चौक, संतोष हॉल, वडगाव ब्रिज हायवे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले.

Share: