IMG-LOGO
क्रीडा

गावस्करांची भविष्यवाणी; हा यष्टीरक्षक होऊ शकतो टीम इंडियाचा कर्णधार

Thursday, May 13
IMG

23 वर्षांच्या ऋषभ पंतकडे भारताचा सर्वोत्तम कर्णधार बनण्याची गुणवत्ता आहे, असं गावसकरांना वाटतं.

मुंबई, दि. १३ मे : सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी टीम इंडियाच्या (Team India) भवितव्याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. टीम इंडियाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) भविष्यात भारताचा कर्णधार होईल, आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL) दिल्ली कॅपिटल्सचं पंतने नेतृत्व सांभाळलं, ते बघता  ऋषभ पंतकडे भारताचा सर्वोत्तम कर्णधार बनण्याची गुणवत्ता आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये युवा रिषभ पंतच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्स संघाने सर्वोत्तम कामगिरी केली. पंतने यंदा पहिल्यांदाच एखाद्या संघाचे नेतृत्व केले. त्यामुळे त्याला सतत कर्णधारपदाविषयी प्रश्न विचारले जात होते आणि साधारण सहाव्या सामन्यानंतर त्याला या प्रश्नाचा कंटाळा आल्याचे आपण पाहू शकत होतो. प्रत्येक सामन्यानंतर त्याला एकच प्रश्न विचारला जात होता. पंतमध्ये कर्णधार म्हणून यशस्वी होण्याची क्षमता असल्याचे आता दिसून आले आहे. त्याने काही चुका केल्या, पण कोणता कर्णधार चुका करत नाही? असा सवाल गावस्करांनी उपस्थित केला.

Share: