IMG-LOGO
क्रीडा

IPL 2021 : दिल्लीची पंजाबवर 7 गडी राखून मात

Monday, May 03
IMG

कसिगो रबाडाने ख्रिस गेलला फुलटॉस बॉल टाकला आणि त्यावर ख्रिस गेलनं षटकार आणि चौकार मारायला सुरुवात केली.

अहमदाबाद, दि. ३ मे  :  नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या २९व्या लीग मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सने ७ विकेट राखून विजय मिळवला. टॉस जिंकून दिल्लीने गोलंदाजी स्वीकारली. पंजाबने २० ओव्हरमध्ये ६ बाद १६६ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सने १७.४ ओव्हरमध्ये ३ बाद १६७ धावा करुन मॅच जिंकली.दिल्लीला सलामीच्या जोडीने ६३ धावांची भागीदारी करुन छान सुरुवात करुन दिली. पृथ्वी शॉ २२ चेंडूत ३९ धावा करुन हरप्रीत ब्रारच्या चेंडूवर क्लीनबोल्ड झाला. शिखर धवनने मात्र अतिशय जबाबदारीने खेळत अखेरपर्यंत मैदानात उभे राहून दिल्लीच्या विजयाचा मार्ग सोपा केला. धवनने ४७ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर नाबाद ६९ धावा केल्या.कसिगो रबाडाने ख्रिस गेलला फुलटॉस बॉल टाकला आणि त्यावर ख्रिस गेलनं षटकार आणि चौकार मारायला सुरुवात केली. रबाडाने फुलटॉस पण घातकी बॉल टाकला त्यावर ख्रिस गेलची दांडी उडाली तो बोल्ड आऊट झाला. केएल राहुलची प्रकृती बिघडल्यानं संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी मयंक अग्रवालच्या खांद्यावर देण्यात आली आहे.फिरकीपटू अक्षर पटेलने मलानची दांडी गुल करत पंजाबला तिसरा धक्का दिला. मलान बाद झाल्यानंतर मयंकला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. त्याने एका बाजूने संघाला सावरले. मयंकने 58 चेंडूत 8 चौकार व 4 षटकारांसह 99 धावांची नाबाद खेळी केली. दिल्लीकडून कगिसो रबाडाने 4 षटकात 36 धावा देत 3 बळी टिपले.  दिल्लीने 3 गडी गमावत 17.4 षटकातच हे लक्ष्य गाठले.

Share: