सोमवारी कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना कोरोना बाधित झाल्यानंतर बंगळुरुसोबत होणारा सामना पुढे ढकलावा लागला.
मुंबई, ता. ४ मे : आयपीएल चे पुढले सर्व सामने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा BCCI केली आहे. पुढील सामने स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला असला तरी देखील या वर्षात पुढे कधी खेळवले जाणार यासंदर्भात अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.सोमवारी कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना कोरोना बाधित झाल्यानंतर बंगळुरुसोबत होणारा सामना पुढे ढकलावा लागला. दरम्यान, चेन्नईच्या संघातील तिघांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यानंतर मंगळवारी हैदराबादचा वृद्धिमान साहा यालाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा फिरकीपटू अमित मिश्राला कोरोनाची लागण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं सुरक्षेच्या कारणास्तव स्पर्धा रद्द करत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलियाकडून याआधीच भारतीय प्रवासी विमानांवर १५ मेपर्यंत प्रवास बंदी लागू केली आहे. काही ऑस्ट्रेलिया खेळाडू यांनी कोरोनामुळे आधीच स्पर्धा सोडली आहे. त्यात भारताचा फिरकीपटू आर. अश्विनचाही समावेश आहे.