IMG-LOGO
क्रीडा

IND vs AUS T20 : टीम इंडियाची विजयी सलामी

Friday, Dec 04
IMG

प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला साजेशी सुरुवात करता आली नाही. शिखर धवन ( १) आणि विराट कोहली ( ९) स्वस्तात माघारी परतले.

सिडनी, दि. ४ डिसेंबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी२० सामन्यांच्या मालिकेला आज कॅनबेरा येथे प्रारंभ झाला. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ११ धावांनी पराभूत केले. वनडे मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघाने टी२० मालिकेला विजयाने सुरुवात केली आहे. भारताच्या विजयात पदार्पण करणाऱ्या वेगवान गोलंदाज टी नटराजनने ऑस्ट्रेलियाचे तीन महत्त्वपूर्ण बळी मिळवत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. या तीन बळींसह नटराजन भारताचा अव्वल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यासह एका अनोख्या विक्रमात सामील झाला आहे. विशेष म्हणजे नटराजनला आपली पहिली टी२० कॅपदेखील बुमराहच्या हस्ते देण्यात आली होती.प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला साजेशी सुरुवात करता आली नाही. शिखर धवन ( १) आणि विराट कोहली ( ९) स्वस्तात माघारी परतले. संजू सॅमसन १५ चेंडूंत २३ धावा करून माघारी परतला. वन डे मालिकेत बाकावरच बसलेल्या मनीष पांडेला आज संधी मिळाली, परंतु तो अवघे दोन धावा करून माघारी परतला. लोकेश ४० चेंडूंत ५ चौकार व १ षटकार मारून ५१ धावांवर माघारी परतला. हार्दिकनं काही अफलातून फटके मारले, परंतु त्याला १६ धावांवर माघारी जावं लागलं. मोइजेस हेन्रीक्सनं ४-०-२२-३ अशी कामगिरी केली. जडेजानं २३ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह नाबाद ४४ धावा केल्या, टीम इंडियानं ७ बाद १६१ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला १५० रनच करता आले.

Share: