IMG-LOGO
महाराष्ट्र

पक्ष का फुटले हे देशाला नाही तर जगाला माहिती; जयंत पाटील यांची राज ठाकरेंवर टीका

Saturday, Jul 27
IMG

१० पैकी ८ जागा आणि ९वी जागा आल्यातच जमा आहे. एवढा परफॉर्मन्स सहसा दिसत नाही. तो आज दिसतोय”, असं जयंत पाटील म्हणाले.

मुंबई, ‍‍दि. २६ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आगामी विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली. मनसे सत्तेत आली पाहिजे, यासाठी आपण २२५ ते २५० जागा लढवायच्या आहेत, अशी घोषणाच त्यांनी केली. त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली आहे.  “महाराष्ट्रातील जनतेने शरद पवारांच्या आणि सुप्रिया सुळेंच्या भूमिकेला समर्थन दिलंय. महाराष्ट्रातील लोकांना नैतिकतेचं महत्त्व आहे. नैतिकतेला महत्त्व देणारी महाराष्ट्रातील जनता आहे तोवर आम्हाला चिंतेचं कारण नाही. त्यामुळे आमचा पक्ष का फुटला, कोणत्या कारणाने फुटला. हे सर्व देशाला नाही, तर जगाला माहितेय. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता शरद पवारांच्या मागे उभी आहे. नाहीतर १० पैकी ८ जागा आणि ९वी जागा आल्यातच जमा आहे. एवढा परफॉर्मन्स सहसा दिसत नाही. तो आज दिसतोय”, असं जयंत पाटील म्हणाले. 

Share: