जयसिंगराव गायकवाड यांनी सुरुवातीपासून मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह धरला होता. हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे खेचून आणायचा असेल तर मला उमेदवारी द्यावी, असे त्यांनी म्हटले होते.
मुंबई, दि. २४ नोव्हेंबर : भाजपला रामराम करत जयसिंगराव गायकवाड यांनी आज (२४ नोव्हेंबर) राष्ट्रवादी कॉंग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रावादीत प्रवेश केला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपच्या जयसिंगराव गायकवाड यांनी बंड करत आज अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. औरंगाबाद पदवीधर निवडणूक भाजपच्या तिकीटावर जयसिंगराव गायकवाड इच्छुक होते. परंतु भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे गायकवाडांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. गायकवाडांची समजूत घालण्याचा प्रयत्न पक्षाने केला, परंतु अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी जयसिंगरावांनी उमेदवारी मागे घेतली खरी, परंतु भाजपलाही सोडचिठ्ठी दिली.जयसिंगराव गायकवाड यांनी सुरुवातीपासून मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह धरला होता. हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे खेचून आणायचा असेल तर मला उमेदवारी द्यावी, असे त्यांनी म्हटले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावरून 'प्रयोग थांबवा, काकांना उमेदवारी द्या' अशी मागणी केली जात होती.जयसिंगराव गायकवाड यांना मानणारा मोठा वर्ग मराठवाड्यात आहे. त्यांनी दोन वेळा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्त्व केले आहे. गेल्या काही वर्षांपासून जयसिंगराव गायकवाड सक्रिय राजकारणापासून दूर होते. मात्र, आता त्यांनी पुन्हा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती