कंगना प्रत्येक विषयावर आपले मत व्यक्त करतेच कंगनाने अलीकडेच शेतकरी आंदोलना विरोधात एक ट्विट केले आहे.
मुंबई, दि. ८ डिसेंबर : कंगना रनौत सध्या सोशल मीडियावर तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे टार्गेट देखील होते आहे. मात्र, असे असताना देखील कंगना प्रत्येक विषयावर आपले मत व्यक्त करतेच कंगनाने अलीकडेच शेतकरी आंदोलना विरोधात एक ट्विट केले आहे. यामुळे तिला बॉलिवूड, पंजाबी आणि भोजपुरी कलाकारांनी टार्गेट केले. आता कंगनाने आजच्या भारत बंद विषयी एक ट्विट केले आहे.कंगनाने भारत बंद बद्दल एक व्हिडिओ ट्विटवर शेअर केला आहे की, चला चला भारत बंद करू या, आपल्याकडे वादळांची कमतरता नाही, आणा कुऱ्हाड काही भाग करूयात, प्रत्येक आशा येथे दररोज मरत आहे. देशभक्तांनो आता तुम्हीपण स्वत: साठी देशाचा एखादा तुकडा मागा, या तुम्हीपण रस्त्यावरआणि आंदोलन करा आज हा विषयच संपवू.अशाप्रकारचे ट्विट कंगनाने केले आहे. हे ट्विट करून कंगना अनेकांवर निशाना देखील साधला आहे.