कंगना आणि तिची बहिण रंगोली चंदेल या दोघींनी आपला जबाब वांद्रे पोलिस ठाण्यात नोंदवला आहे. जवळपास दोन तास दोघींची पोलिसांनी चौकशी केली.
मुंबई, दि. ८ जानेवारी : राजद्रोहाचा खटला दाखल झाल्यानंतर अभिनेत्री कंगना रानावत आणि तिची बहिणी रंगोली चंदेल अखेर वांद्रे पोलिस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी दाखल झाली. या वेळी माझ्या ट्वीटमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, असे मला वाटत नाही,’ असे उत्तर त्यांनी पोलिसांना दिले. कंगना आणि तिची बहिण रंगोली चंदेल या दोघींनी आपला जबाब वांद्रे पोलिस ठाण्यात नोंदवला आहे. जवळपास दोन तास दोघींची पोलिसांनी चौकशी केली. आपण केलेले ट्वीट काही गैर नाही, ट्विटर हे एक सोशल मीडिया प्लेटफॉर्म आहे, त्यामुळे तिथे अनेक ट्विट केले जातात. माझ्या ट्वीटमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, असे मला वाटत नाही,’ असे उत्तर तिने पोलिसांना दिले. राजद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणे अशा स्वरुपाचे गुन्हे वांद्रे पोलिसांनी कंगना विरोधात दाखल केले आहेत. कंगना आणि तिची बहिण रंगोली या दोघींनी अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू नंतर मोठ्या प्रमाणात ट्वीट केले होते. यापैकी एका ट्विटवर आक्षेप घेत साहिल नावाच्या एका व्यक्तीने वांद्रे न्यायालयात कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होवून न्यायालयाने कंगना विरोधात राजद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणे या कलमांखाली गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. वांद्रे पोलिसांनी कंगना आणि तिच्या बहिणीच्या विरोधात गुन्हा नोंदवून दोघींना चौकशी करता तसेच जबाब नोंदवण्याकरता हजर राहण्याची नोटीस धाडली होती; पण कधी नातेवाइकांच्या लग्नाचे तर कधी कोरोनाचे कारण देत कंगनाने पोलिसांच्या नोटिशीला केराची टोपली दाखवली होती आणि थेट या गुन्ह्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. मुंबई उच्च न्यायालयाने आज कंगना आणि तिच्या बहिणीला चौकशी करता हजर राहण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कंगना आज स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाली. आता पोलिस पुढे काय कारवाई करता हे पाहायचे. कंगना वादग्रस्त ट्वीटमुळे कायम वादाच्या भोवर्यात सापडली आहे. शिवसेनेचा तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा तिने उपमर्द केला आहे. मुंबईचा उल्लेख पाकव्याप्त काश्मीर असा केल्यापासून ती सात्यत्याने चर्चेत असते. उच्च न्यायालयाने तिला वादग्रस्त वक्तव्याबद्दल समज दिली होती.