IMG-LOGO
क्रीडा

रोहित शर्मासह पाच जणांना 'खेल रत्न' पुरस्कार जाहीर

Friday, Aug 21
IMG

रोहित शर्माची खेलरत्नसाठी निवड झाल्यास हा मानाचा पुरस्कार मिळवणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरणार आहे.

नवी दिल्ली, दि. २१ ऑगस्ट : क्रीडा क्षेत्रात मानाचा समजला जाणारा राजीव गांधी खेलनवी दिल्ली: क्रीडा क्षेत्रात मानाचा समजला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी नावाची घोषणा आज शुक्रवारी २१ ऑगस्ट रोजी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने केली. यात भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा, पॅरा अॅथलेटिक्स मरिअप्पन थंगवेलू, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, कुस्तीपटू विनेश फोगाट आणि हॉकीपटू राणी यांचा समावेश आहे. क्रीडा मंत्रालयाच्या इतिहासात एकाचवेळी पाच खेळाडूंना खेलरत्नने गौरविण्याची ही पहिली वेळ असेल. यापूर्वी २०१६ मध्ये स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, जिम्नॅस्ट दीपा करमाकर, नेमबाज जितू राय आणि महिला मल्ल साक्षी मलिक यांना एकाचवेळी खेलरत्नने गौरविण्यात आले होते.रोहित शर्माची खेलरत्नसाठी निवड झाल्यास हा मानाचा पुरस्कार मिळवणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरणार आहे. मागील वर्षी केलेल्या कामगिरीची दखल घेत बीसीसीआयने रोहित शर्माच्या नावाची शिफारस केली. याआधी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सचिनला १९९८ साली, धोनीला २००७ तर विराटला २०१८ साली हा पुरस्कार मिळाला होता.रत्न पुरस्कारासाठी नावाची घोषणा आज शुक्रवारी २१ ऑगस्ट रोजी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने केली. यात भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा, पॅरा अॅथलेटिक्स मरिअप्पन थंगवेलू, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, कुस्तीपटू विनेश फोगाट आणि हॉकीपटू राणी यांचा समावेश आहे. क्रीडा मंत्रालयाच्या इतिहासात एकाचवेळी पाच खेळाडूंना खेलरत्नने गौरविण्याची ही पहिली वेळ असेल. यापूर्वी २०१६ मध्ये स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, जिम्नॅस्ट दीपा करमाकर, नेमबाज जितू राय आणि महिला मल्ल साक्षी मलिक यांना एकाचवेळी खेलरत्नने गौरविण्यात आले होते.रोहित शर्माची खेलरत्नसाठी निवड झाल्यास हा मानाचा पुरस्कार मिळवणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरणार आहे. मागील वर्षी केलेल्या कामगिरीची दखल घेत बीसीसीआयने रोहित शर्माच्या नावाची शिफारस केली. याआधी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सचिनला १९९८ साली, धोनीला २००७ तर विराटला २०१८ साली हा पुरस्कार मिळाला होता.

Share: