IMG-LOGO
महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले

Saturday, Jul 27
IMG

पंचगंगेची धोका पातळी ४३ फूट आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील आतापर्यंत ८४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

कोल्हापूर, ‍‍दि. २७  :  कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपले आहे. पंचगंगा नदीचे पाणी तीन दिवसांपूर्वीच पात्राबाहेर आले होते. तर सोमवारी सकाळी ११च्या सुमारास पंचगंगेने इशारा पातळी गाठली होती. पंचगंगा नदीची पाणीपातळी ३९ फुटावर गेली असून पंचगंगा नदीने आता धोका पातळीकडे वाटचाल सुरु केली आहे. पंचगंगेची धोका पातळी ४३ फूट आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील आतापर्यंत ८४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर, शाहूवाडी तालुक्यात मलकापूर शेजारी जाधववाडी येथे २ फूट पाणी आल्याने महामार्ग बंद करण्यात आला आहे. तर वाहतूक पर्यायी मार्ग असलेल्या अनुस्कुरा घाटमार्ग वरनमळी येथे बंद झाला आहे. यामुळे कोल्हापुराहून रत्नागिरीला जाणारे दोन्ही मार्ग बंद झाले आहेत. तसेच ७ राज्यमार्ग आणि १५ प्रमुख मार्ग असे एकूण २२ मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. काही मार्गांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

Share: