तिशा आपल्या वडिलांबरोबर टी-सीरिजने आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांना दिसायची. ती शेवटची रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ चित्रपट यशस्वी झाल्यानंतर आयोजित केलेल्या पार्टीमध्ये दिसली होती.
दिल्ली, दि. १९ : चित्रपट निर्माते कृष्ण कुमार यांच्या मुलीचे तिशाचे वयाच्या एकविसाव्या वर्षी निधन झाले आहे. दीर्घकाळ ती कर्करोगाबरोबर लढा देत होती. काल १८ जुलैला उपचारादरम्यान तिचे निधन झाले आहे. तिशा कुमारवर जर्मनीमध्ये उपचार सुरू होते. कुमार कुटुंबाच्या जवळच्या व्यक्तीने तिच्या निधनाची पुष्टी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिशाला कर्करोगाचे निदान झाल्यानंतर कुमार कुटुंबाने तिला उपचारासाठी जर्मनीमध्ये नेण्याचा निर्णय घेतला. तिथेच तिचे काल १८ जुलैला गुरुवारी निधन झाले आहे. कुटुंबासाठी अत्यंत दु:खद आणि कठीण काळ असल्याचे म्हणत टी-सीरिजने एक निवेदन जारी केले आहे.