IMG-LOGO
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री आशा शर्मा यांचे दीर्घ आजाराने निधन

Sunday, Aug 25
IMG

आशा यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुंबई, दि. २५ : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आणि काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा शर्मा यांचे निधन झाले आहे. गेल्या एक वर्षापासून आशा हा आजारी होत्या. अखेर त्यांची या आजाराशी झुंज अपयशी ठरली. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिने आणि टीव्ही आर्टीस्ट असोसिएशनने आशा यांच्या निधनाची माहिती दिली आहे. आशा यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.गेल्या काही वर्षांपासून त्या आजारी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी वयाच्या ८८व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. आशा यांच्या कुटुंबीयांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण अनेक कलाकार हे सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

Share: