किंमत १५ कोटी रुपये आहे. हा मुकूट बनवण्याकरता कारागीरांना दोन महिने लागले होते.
मुंबई, दि. ७ : यंदा लालबागच्या राजाला मरून रंगाचं वेल्वेटचं सोवळं नेसवण्यात आलं आहे. तर, काशी विश्वनाथ मंदिराच्या थीमचा देखावा साकारण्यात आला आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात विश्वस्तपदी नियुक्ती झालेल्या अनंत अंबानी यांनी राजाला सोन्याचा मुकूट भेट दिला आहे. या मुकुटाचं वजन २० किलो एवढं आहे. तर, किंमत १५ कोटी रुपये आहे. हा मुकूट बनवण्याकरता कारागीरांना दोन महिने लागले होते, अशी माहिती लालबागच्या राजाचे मानव सचिव सुधीर साळवी यांनी दिली.