IMG-LOGO
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 Result : NDA आघाडीला २९४, INDIA आघाडीला २३२ जागा

Wednesday, Jun 05
IMG

महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशात काँग्रेसची कामगिरी सुधारली.

दिल्ली, दि. ४ : लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल हाती आले आहे.  २०१४ आणि २०१९ मधील मोठ्या पराभवानंतर पहिल्यांदाचा काँग्रेस १०० जागांच्या जवळ पोहोचलीय. २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला २०६ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसला अनेक राज्यांमध्ये मोठं यश मिळालंय. काँग्रेसनं २०२४ च्या निवडणुकीत स्वत:च्या कामगिरीत सुधारणा केली. भाजपा विरोधात विरोधी पक्षांची इंडिया आघाडी करण्याचा पक्षाला फायदा झाला. महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशात काँग्रेसची कामगिरी सुधारली. त्याचबरोबर कर्नाटक आणि राजस्थान या या राज्यात भाजपा आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होती. त्या राज्यातही काँग्रेसनं चांगली कामगिरी केली आहे. तर  एनडीए आघाडीला  २९४, india आघाडीला २३२ अशा जागा मिळाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत कोणाला किती  जागांवर विजय मिळाला?देशपातळीवरील समीकरणंएनडीए आघाडी- 294इंडिया आघाडी- 232इतर-17महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबलमहाविकास आघाडी- 30महायुती- 17अपक्ष- 1महायुतीमधील पक्षीय बलाबलभाजप- 9शिवसेना (शिंदे गट)-7राष्ट्रवादी काँग्रेस-1महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?काँग्रेस- 13ठाकरे गट-9शरद पवार गट-8

Share: