सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
नांदेड, दि. १४ : नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने हैदराबादला हलवण्यात आलं आहे. वसंत चव्हाण यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना नांदेडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना पुढील उपचारासाठी हैदराबादमधील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.