आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून धोनीचा उत्कृष्ट विक्रम आहे आणि त्याने या स्पर्धेतील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून नाव कोरले आहे.
बंगळुरू, दि. २२ : महेंद्रसिंह धोनी याने कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. आता चेन्नई सुपर किंग्जच्या नेतृत्वाची धुरा मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवण्यात आली आहेत.आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून धोनीचा उत्कृष्ट विक्रम आहे आणि त्याने या स्पर्धेतील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून नाव कोरले आहे. चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएलच्या १४ हंगामांपैकी १२ वेळा प्लेऑफसाठी पात्र ठरला, त्यापैकी १० वेळा अंतिम सामना खेळला आणि पाच वेळा विजेतेपद पटकावण्यात यशस्वी झाला. महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २०२४ मोसमाच्या सुरुवातीलाच चेन्नईचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ऋतुराज हा चेन्नईचा प्रमुख घटक असून २०१९पासून त्याने ५२ सामन्यांत चेन्नईचे प्रतिनिधित्व केले आहे. २००८ पासून आयपीएलशी जोडल्या गेलेल्या काही खेळाडूंमध्ये धोनीचा समावेश होतो. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत २५० सामने खेळले आहेत. या लीगमध्ये त्याने ५०८२ धावा केल्या आहेत आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो सातव्या स्थानावर आहे.