IMG-LOGO
नाशिक शहर

जादू म्हणजे निव्वळ मनाचे खेळ आणि विचारांची गुंफन : देशमुख

Monday, May 27
IMG

वसंत व्याख्यानमालेत स्व. श्रीमती निर्मला केशव गरुड स्मृती व्याख्यानात ते 'मनाचा शोध आणि वाचन' या विषयावर बोलत होते.

नाशिक, दि. २७  : सुंदर मनामध्ये कधी भयानकता येईल, हे कुणीही सांगु शकत नाही. कारण मन जसे सुंदर असते, तसेच ते भयानक असते. जादू हा प्रकार म्हणजे याच विचारांचा खेळ आहे. तसेच जादूमध्ये गणिताचाही महत्वाचा भाग असतो. या मनाच्या खेळालाच प्रेमोनेशन म्हणजेच मनाचे खेळ असे म्हणतात. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मनोविश्लेषक व दृष्टीभ्रमकार सतीश देशमुख यांनी येथे केले. वसंत व्याख्यानमालेत स्व. श्रीमती निर्मला केशव गरुड  स्मृती व्याख्यानात ते 'मनाचा शोध आणि वाचन' या विषयावर बोलत होते. सुरुवातीला स्व. श्रीमती निर्मला केशव गरुड यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत दाखवून व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. श्रीकांत जोंधळे, विवेक गरुड, शांताराम रायते व्यासपीठावर उपस्थित होते. व्याखानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. श्री. देशमुख यांनी बालपणी नाशिकमध्ये असतानाचा एक प्रसंग सांगुन त्यावेळी मित्र जे बोलला त्याचा विचार मी आयुष्यभर केला आणि त्यातुनच नाशिकचा डंका जगभर वाजवू शकल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये आपण केलेला विचार हीच मनाची भयानकता असते. नाट्य, संगित, जादू या गुणांमुळे मनात असेच वेगवेगळे विचार यायचे, असे सांगताना त्यांनी त्याकाळी नाटकात साकारलेल्या भूमिकांचे सादरीकरण करून दाखवले. या भूमिका साकारताना जे संवाद असायचे ते सर्वच विचार बनुन प्रेरणा देत गेले. या अनुषंगाने त्यांनी तीन भागांत विभाजन करत सादरीकरण केले. यात माणसाचा चेहरा काय बोलतो, त्याची बॉडी लँग्वेज आणि तुमच्या मनात काय चालले या तिन माध्यमातून मनातले विचार ओळखता येतात. तुमच्या शरीराचा प्रत्येक अवयव बोलतो. असे सांगत त्यांनी प्रेक्षकांमध्ये चेंडु फेकून ज्याने तो पकडला त्याच्या मनात सुरू असलेले विचार ओळखून साऱ्यांनाच आचंभित केले. याच धर्तीवर विविध प्रयोग त्यांनी सादर केले. दुसऱ्या टप्प्यात त्यांची कन्या किमया यांनीही सादरीकरणमध्ये भाग घेऊन दृष्टीभ्रमाचे अनेक प्रयोग सादर केले.दरम्यान, सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाशिक डॉक्टर्स म्युझिक सर्कल प्रस्तुत 'टाईमलेस मेलोडिज' हा गाण्यांचा कार्यक्रम झाला. यामध्ये डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. क्षमा आघोर, डॉ. भूषण पुस्तके, डॉ. अमृता घरोटे यांनी सुमधुर हिंदी क्लासिक गाणी सादर केली. त्यांना अमोल पाळेकर, जयेश भालेराव, सुशील केदारे यांनी संगितसाथ केली.

Share: