IMG-LOGO
मनोरंजन

कॉमेडियन भारतीसह तिच्या पतीला कोर्टाचा दिलासा, जामीन मंजूर

Monday, Nov 23
IMG

न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर हर्षची तळोजा तर, भारतीची कल्याण जेलमध्ये रवानगी करण्यात आली.

मुंबई, दि. २३ नोव्हेंबर: ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे किल्ला कोर्टाने 15000 रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे. अटक झाल्यानंतर भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी जामिनासाठी किल्ला कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या या जामीन अर्जावर आज (23 नोव्हेंबर) सकाळपासून सुनावणी सुरू होती.न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर हर्षची तळोजा तर, भारतीची कल्याण जेलमध्ये रवानगी करण्यात आली. दोघांवरही कन्सेप्शनचे चार्जेस लावण्यात आले आहेत. एनडीपीएस कायदा १९८५, कलम २० अ, २० ब २ आणि २७ अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांनी किल्ला कोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता.हा अर्ज आज मंजूर करण्यात आला.

Share: