२० नोव्हेंबरला महाराष्ट्राची निवडणूक एका टप्प्यात होईल. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल.
दिल्ली, दि. १५ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख आणि निकाल या दोन्हीची तारीख जाहीर झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज ही घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात निवडणूक कधी जाहीर होणार? याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही दिवसांपूर्वी राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत २६ नोव्हेंबरच्या आधी निवडणूक घेतली जाईल असं म्हटलं होतं. आज अखेर या निवडणुकीची आणि निकालाच्या दिवसाची घोषणा झाली आहे.महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे. २० नोव्हेंबरला एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहेत. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली आहे. गॅझेट नोटिफिकेशनची तारीख २२ ऑक्टोबर असेल तर २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. ३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर २०२४ अशी असणार आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्राची निवडणूक एका टप्प्यात होईल. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल.