महाविकास आघाडी विरूद्ध महायुती या लढतीमुळे राज्याच, देशाचचं नव्हे, अनेक देशांचंही लक्ष लागलं आहे.
मुंबई, दि. २ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकारणाचा पारा चांगलाच चढला. महाराष्ट्रात यंदा अभुतपूर्व अशी निवडणूक होणार आहे. २०१९ नंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. दोन्ही पक्षातून एक-एक गट बाहेर पडला. त्यामुळे यंदा महाराष्ट्रात सहा प्रमुख पक्षांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. महाविकास आघाडी विरूद्ध महायुती या लढतीमुळे राज्याच, देशाचचं नव्हे, अनेक देशांचंही लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) राज्यात चांगलाच अक्टिव्ह झाला आहे. आरएसएसने जनसंपर्क कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रात भाजपचे काम सुरू केलं आहे. हरयाणा राज्यातील निवडणुकीतही आरएसएसने असेच कार्यक्रम केल्याने भाजपला फायदा झाला होता. RSS मधील काही महत्त्वाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण राज्यात मतदार जागृतीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या तीन लाखांहून अधिक लहान सभा आयोजित केल्या जाणार आहेत. या रणनीतीमध्ये आरएसएस एक सुसंघटित यंत्रणा म्हणून काम करेल. या मोहिमेसाठी आरएसएस तीन मोठे कार्यक्रम आयोजित करणार आहे.