IMG-LOGO
महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद!

Wednesday, Sep 23
IMG

सुप्रीम कोर्टाने स्थगिती मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरु लागली आहे. त्यातच मराठा नेत्यांनी १० ऑक्टोबरला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.

मुंबई, दि. २३ सप्टेंबर :  सुप्रीम कोर्टाने स्थगिती मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरु लागली आहे. त्यातच मराठा नेत्यांनी १० ऑक्टोबरला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. कोल्हापुरात आज (२३ सप्टेंबर) पार पडलेल्या मराठा समाज गोलमेज परिषदेत हा निर्णय घेण्यात आला आहे. मागण्या मान्य झाल्या तर महाराष्ट्र बंद मागे घेऊ, पण समाधानी प्रतिसाद मिळाला नाही तर महाराष्ट्रातील मराठा समाज १० ऑक्टोबरला रस्त्यावर येईल असे सांगण्यात आले आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अध्यक्ष सुरेश पाटील यांनी ही माहिती दिली. कोल्हापुरात पार पडलेल्या मराठा गोलमेज परिषदेत १५ ठराव करण्यात आले आहेत. ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्यास बंद मागे घेऊ अशी माहिती देण्यात आली. तसंच पुढील काळात राज्यभर आंदोलन सुरु राहील असं पत्रकार परिषदेत सांगितलं. मंत्रिमंडळ बैठकीत मराठा समाजासाठी मदत जाहीर करण्यात आली आहे. पण ही मदत कधी आणि कशी दिली जाईल याचा खुलासा होणं आवश्यक आहे. 

Share: