IMG-LOGO
महाराष्ट्र

महाविकास आघाडीचं सरकार जास्त काळ टिकणार नाही

Friday, Jan 29
IMG

विधान परिषदेचे पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या 'वर्षभराचा लेखाजोखा' या पुस्तकाचं प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी आशिष शेलार आणि प्रविण दरेकर यांनी फडणवीसांचं कौतुक केलं.

मुंबई, दि. २९ जानेवारी : आमच्या धमन्यांमध्ये विदर्भाचे रक्त आहे, आम्हाला विदर्भाचे प्रेम शिकवू नये', या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा फडणवीस यांनी समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी असं वक्तव्य करणे हेच आमचं यश आहे. पण केवळ विदर्भाचं रक्त असून चालत नाही. विदर्भ आणि मराठवाड्यावर होणारा अन्याय आधी थांबवला पाहिजे. मग विदर्भाच्या रक्तावर बोला, असा टोला फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.विधान परिषदेचे पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या 'वर्षभराचा लेखाजोखा' या पुस्तकाचं प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी आशिष शेलार आणि प्रविण दरेकर यांनी फडणवीसांचं कौतुक केलं. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार आशिष शेलार आदी भाजप नेत्यांसह दादा महाराज मोरे हे देखील उपस्थित होते. सरकारने विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय केल्याचा फडणवीस यांनी पुनरुच्चार केला. मराठवाड्यात सिंचनाची आणि 'वॉटर ग्रीड'ची कामं बंद का आहेत. याबद्दल तुम्ही चकार शब्द का काढत नाही?, असा सवाल त्यांनी यावेळी केला. दरम्यान, महाविकास आघाडीचं सरकार जास्त काळ टिकणार नाही असं भाकीत भाजप नेत्यांनी वर्तवलं असून हे सरकार आम्हाला पडण्याची गजर नाही तर ते स्वतःच्या पायात पाय अडकून पडेल असं विधान करणाऱ्या फडणवीसांनी पुन्हा एकदा सत्ता स्थापनेविषयी संकेत दिले आहेत.आता फार काळ विरोधात आपण बसणार नाही असे विधान केले. फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे.

Share: