लवकरच 'जुग जुग जियो' या चित्रपटात मनीष आणि वरुण झळकणार आहेत. राज मेहता या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून अभिनेत्री नीतू कपूर बऱ्याच वर्षानंतर या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पुन्हा पदार्पण करणार आहेत.
मुंबई, दि. ७ डिसेंबर : बॉलिवूड अभिनेता आणि कॉमेडियन मनीष पॉल याला कोरोनाची लागण झाली आहे. 'जुग जुग जियो' या नव्या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान मनीष पॉल याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं जात आहे. मनीष पॉलला गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षण जाणवत होती. त्यानंतर त्याने कोरोना चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान मागील आठवड्यात जुग जुग जियोचे दिग्दर्शक राज मेहता, अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री नितू कपूर कोविड 19 पॉझिटीव्ह आहेत. यापैकी वरूण धवन आयसोलेशनमध्ये आहे. तर नीतू कपूर यांना मुंबईमध्ये आणण्यासाठी रणबीर कपूरने विशेष एअर एम्ब्युलंसची सोय केली आहे.मनीष मल्होत्रा याने नोव्हेंबर महिन्यात जुग जुग जियो सिनेमाच्या टीमला जॉईन केले होते मात्र टीम मधील अन्य कलाकार कोविड 19 पॉझिटीव्ह असल्याचं समजल्यानंतर चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे. मनीष त्यानंतर मुंबईमध्ये परतला. मुंबईमध्ये परतल्यानंतर ताप आल्याने त्याची कोविड टेस्ट करण्यात आली जी पॉझिटीव्ह आली आहे. लवकरच 'जुग जुग जियो' या चित्रपटात मनीष आणि वरुण झळकणार आहेत. राज मेहता या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून अभिनेत्री नीतू कपूर बऱ्याच वर्षानंतर या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पुन्हा पदार्पण करणार आहेत.