किनारपट्टी परिसरातही गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अलिबाग येथे २९ मिलिमीटर, हर्णे येथे ५५, कुलाबा ४५, सांताक्रुज ७७, रत्नागिरी येथे ३४ मिमी पाऊस पडला आहे.
पुणे, दि.२५ : आज सकाळपासून कोकणासह (Maharashtra Heavy Rain) मुंबई, ठाणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. लोणावळा (टाटा) ३११, लोणावळा ३२९, शिरगाव ४८४, आंबोणे ४४०, डुंगरवाडी ४०७, कोयना (पोफळी) १३२, कोयना (नवजा) १५७, खोपोली २२५, ताम्हिणी ५५६ आणि भिरा ४०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. किनारपट्टी परिसरातही मध्यम ते मुसळधार पाऊस पडला, तर गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अलिबाग येथे २९ मिलिमीटर, हर्णे येथे ५५, कुलाबा ४५, सांताक्रुज ७७, रत्नागिरी येथे ३४ मिमी पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे १४३ मिलिमीटर, कोल्हापूर येथे १७, सातारा येथे २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.