IMG-LOGO
क्रीडा

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन

Tuesday, Jun 11
IMG

मॅच संपल्यानंतरच त्यांच्या हृदयविकाराचा तीव्र धक्क्यानं त्यांचं निधन झालं.

मुंबई, दि. ११ : भारत विरुद्ध पाकिस्तान यांची T20 वर्ल्ड कपमधील मॅच पाहण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये गेलेले मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन झाले आहे. काळे यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झाले आहे. ते ४७ वर्षांचे होते. न्यूयॉर्कमध्ये झालेला भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी ते स्टेडियममध्ये उपस्थित होते. मॅच संपल्यानंतरच त्यांच्या हृदयविकाराचा तीव्र धक्क्यानं त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर मुंबई क्रिकेटवर शोककळा पसरली आहे. अमोल काळे यांची ऑक्टोबर २०२२ मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदी निवड झाली होती. भारतीय क्रिकेटची मुंबई पंढरी मानली जाते. त्यामुळे या असोसिएशनच्या अध्यक्षपदाला मोठं महत्त्व आहे. अमोल काळे यांनी माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा या निवडणुकीत 25 मतांनी पराभव केला होता. त्या निवडणुकीत काळे यांना १८३ तर संदीप पाटील यांना १५८ मतं मिळाली होती. भाजप आमदार आणि बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांचा काळे यांना त्या निवडणुकीत पाठिंबा होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही ते निकटवर्तीय होते. मुळचे विदर्भातील असलेले अमोल काळे हे गेल्या एक दशकांपेक्षा जास्त काळापासून मुंबईत व्यवसायाच्या निमित्तानं स्थायिक झाले होते. एमसीए अध्यपदासह ते इंडियनम स्ट्रिट प्रीमियरल लीग या टेनिस बॉल फ्रँचायझी क्रिकेटचे ते को-प्रमोटर होते. यावर्षीच ही लीग स्पर्धा सुरु झाली आहे. 

Share: