कार्यकारिणीच्या ९ जागांवरही परिवर्तन पॅनेलने झेंडा फडकावला. १४ पैकी १४ जागा संदीप चव्हाण यांच्या परिवर्तन पॅनलने जिंकल्या.
मुंबई, दि. ३० : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलने एतिहासिक विजय मिळवला. पत्रकार संघाच्या इतिहासात इतक्या मोठ्या फरकाने सर्व १४ च्या १४ जागा जिंकण्याचा विक्रम परिवर्तन पॅनेलने केला. परिवर्तन पॅनेलचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के आणि कोषाध्यक्ष जगदीश भोवड या तिघांनीही एकूण ४८६ मतांपैकी प्रत्येकी ३०० हून अधिक मतं मिळवत दणदणीत विजय मिळवला.उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी झालेल्या सर्वाधिक चुरशीच्या लढतीत परिवर्तन पॅनेलच्या स्वाती घोसाळकर आणि राजेंद्र हुंजे यांनी बाजी मारली. कार्यकारिणीच्या ९ जागांवरही परिवर्तन पॅनेलने झेंडा फडकावला. परिवर्तन पॅनेलच्या कार्यकारिणी पदावरील प्रत्येक विजयी उमेदवाराने दोनशे पार मते मिळवली. प्रतिस्पर्धी समर्थ पॅनेलच्या एकाही उमेदवाराला दोनशे मतांचा टप्पा गाठता आला नाही.ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर हे समर्थ पॅनेलतर्फे अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या लढतीत संदीप चव्हाण यांनी तब्बल ३१६ मते खेचून घेत १५६ मतांच्या फरकाने विजय मिळवला. खांडेकर यांना १६० मते मिळाली. कार्यवाह पदाच्या लढतीत परिवर्तन पॅनेलच्या शैलेंद्र शिर्केंनी ३०७ मते मिळवत समर्थ पॅनेलच्या दीपक परब (१६६) यांचा पराभव केला. कोषाध्यक्षपदाच्या लढतीत जगदीश भोवड यांनी सर्वाधिक 218 मतांच्या फरकाने सारंग दर्शने (१६६) यांचा पराभव केला. उपाध्यक्षपदाच्या दोन जागांवर परिवर्तन पॅनेलच्या ज्येष्ठ पत्रकार स्वाती घोसाळकर यांनी २८८ मते तर राजेंद्र हुंजे यांनी २२५ मते मिळवत बाजी मारली. समर्थ पॅनेलच्या उदय तानपाठक यांना २०८ मते मिळाली तर विष्णू सोनवणे यांना २०३ मते मिळाली. कार्यकारिणी पदाच्या लढतीत दिवाकर शेजवळ आणि देवेंद्र भोगले यांना सर्वाधिक २८२ मते मिळाली. नाणेफेक करून त्यातील पहिल्या क्रमांकासाठी भोगले यांची वर्णी लागली. निकाल पुढीलप्रमाणेअध्यक्ष- संदीप चव्हाण (विजयी)- 316 डॉ. सुकृत खांडेकर - 160उपाध्यक्ष- पदे 2स्वाती घोसाळकर (विजयी)- 288राजेंद्र हुंजे (विजयी)- 225उदय तानपाठक - 208 विष्णू सोनावणे - 202कार्यवाहशैलेंद्र शिर्के (विजयी)- 307दीपक परब- 166कोषाध्यक्ष जगदीश भोवड (विजयी)– 334सारंग दर्शने-126कार्यकारिणी सदस्य – पदे 91. देवेंद्र भोगले (विजयी) - 2822. दिवाकर शेजवलकर (विजयी) - 2823. गजानन सावंत (विजयी) -2744. आत्माराम नाटेकर (विजयी) - 2735. विनोद साळवी (विजयी) - 2726. किरीट गोरे (विजयी) - 2477.अंशुमान पोयरेकर (विजयी) - 2468. राजेश खाडे (विजयी) - 2459. राजीव कुलकर्णी (विजयी) - 23410. कल्पना राणे - 18511. श्यामसुंदर सोन्नर - 17412. उमा कदम -17213. रवींद्र भोजने -16214. नंदकुमार पाटील -16115. अरविंद सुर्वे -14616. संतोष गायकवाड -14217. विठ्ठल बेलवाडकर -11618. राजेंद्र साळस्कर -10419. महेंद्र जगताप -9420. केतन खेडेकर -92