IMG-LOGO
मनोरंजन

प्रख्यात संगीतकार नरेंद्र भिडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Thursday, Dec 10
IMG

दरम्यान, नरेंद्र भिडे यांच्या निधनानंतर लेखक व दिग्दर्शक 'प्रविण विठ्ठल तरडे' यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

मुंबई, दि. १० डिसेंबर : प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. पुण्यातील डॉन स्टुडिओमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात आले असून वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन मुले आहेत. भिडे यांच्या निधनाने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण उस्ताद महंमद हुसेन खान साहेब, स्वरराज छोटा गंधर्व, बाळासाहेब मते, शैला दातार, सुधीर दातार, सुहास दातार यांच्याकडे तर पाश्चिमात्य संगीताचे शिक्षण हेमंत गोडबोले यांच्याकडे घेतले. त्यांनी अनेक नाटक, मालिका, चित्रपट, जिंगल्स च्या माध्यमातून संगीतक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांना झी गौरव (पाच वेळा), सह्याद्री सिने अवॉर्ड, राज्य नाट्य पुरस्कार ( दोन वेळा), व्ही शांताराम पुरस्कार, श्रीकांत ठाकरे पुरस्कार, म. टा. सन्मान, राज्य चित्रपट पुरस्कार आदि विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.दरम्यान, नरेंद्र भिडे यांच्या निधनानंतर लेखक व दिग्दर्शक 'प्रविण विठ्ठल तरडे' यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. 'नरेंन्द्र भिडे .. माझा हक्काचा एकुलता एक संगीतकार गेला .. ऊन ऊन वठातून , आभाळा आभाळा , अरारारा खतरनाकऽऽऽऽऽ आता पुन्हा होणे नाही .. तीन वर्षांपूर्वी त्याला ज्या दिवशी चाल सुचली तो दिवस..' असं तरडे म्हणाले.

Share: