राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या विविध सेलमध्ये एलजीबीटी हा नवीन सेल सुरू करण्यात आलाय.
मुंबई, दि.०५ ऑक्टोबर : गेल्या काही दशकांपासून पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेत व विरोधी अशा दोन्ही भूमिकांमध्ये सक्रिय असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणखी एक परिवर्तनवादी निर्णय घेतला असून पक्षाचा एलजीबीटी सेल सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असून, राष्ट्रवादी काँग्रेस एलजीबीटी समुदायाचा पक्षातंर्गत सेल करणारा पहिलाच पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या विविध सेलमध्ये एलजीबीटी हा नवीन सेल सुरू करण्यात आलाय. एलजीबीटी कम्युनिटीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत या सेलच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली