IMG-LOGO
महाराष्ट्र

राणे यांना केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा

Thursday, Jan 21
IMG

राज्यातील आजी-माजी मंत्र्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने सरकारने जाहीर केला. भाजपने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासुरक्षेतसुद्धा कपात करण्यात आली होती.

मुंबई, दि. २१ जानेवारी : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे. भाजपचे नेते नारायण राणे यांची सुरक्षा काढून घेण्यात आली; पण आता नारायण राणे यांना केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. राज्यातील आजी-माजी मंत्र्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने सरकारने जाहीर केला. भाजपने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासुरक्षेतसुद्धा कपात करण्यात आली होती. त्याचबरोबर राणे यांच्याकडे असलेली वाय दर्जाची सुरक्षा काढून घेतली होती. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे भाजपने सडकून टीका केली होती; पण आता केंद्र सरकारने ठाकरे सरकारला दणका दिला आहे. राणे यांना केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून सुरक्षा काढल्यानंतर केंद्र सरकारने सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. राणे यांच्या ताफ्यात आता 12 सीआयएस एफचे जवान तैनात असणार आहे. त्याबरोबर भाजपकडून नारायण राणे यांचा कुटुंबीयांकडे आणखी एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. निलेश राणे यांची पक्षाच्या प्रदेश सचिवपदी निवड केली आहे. राणे हे ट्वीटरवर महाविकास आघाडी सरकारवर एकदाही टीका करण्याची संधी सोडत नाही.

Share: