IMG-LOGO
राष्ट्रीय

PM MODI 3.0 : नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारताच शेतकऱ्यांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Monday, Jun 10
IMG

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पीएम शेतकरी सन्मान निधीचा १७ वा हफ्ता जारी केला आ

दिल्ली, दि. १० :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोदींनी महत्त्वाचा निर्णय घेतला. तिसऱ्या टर्ममधील पहिलाच निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतल्याचं दिसून येत आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पीएम शेतकरी सन्मान निधीचा १७ वा हफ्ता जारी केला आहे. यामुळे देशभरातील ९.३ कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल. यादरम्यान पंतप्रधान म्हणाले, शेतकऱ्यांचं कल्याण हे आमचं प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे यापुढेही कृषी क्षेत्रासाठी काम करीत राहू. असेही ते म्हणाले आहेत. यापूर्वी पीएम शेतकरी योजनेअंतर्गत देशातील कोट्यावशी शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या २८ तारखेला 16 वा हफ्ता बँक खात्यात पाठवण्यात आला होता. केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पीएम शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपयांचं अर्थसहाय्य केलं जातं. मात्र या योजनेअंतर्गत ही रक्कम एकरकमी न देता दोन दोन हजार करीत वर्षातून तीनवेळा बँक खात्यात पाठवली जाते.  आत्तापर्यंत पीएम-किसान योजनेचे १६ हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. यामध्ये पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता मिळालेल्या ९.०३ कोटी शेतकऱ्यांपैकी सर्वाधिक २.०३ कोटी उत्तर प्रदेशातील आहेत. तर महाराष्ट्र ८९.६६ लाख, मध्य प्रदेश ७९.९.३ लाख, बिहार ७५.७९ लाख आणि राजस्थान ६२.६६ लाख होते.

Share: