IMG-LOGO
महाराष्ट्र

हेमंत करकरेंना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतील नव्हती, विजय वडेट्टीवारांच्या विधानाने खळबळ पुन्हा पुनरुच्चार

Monday, May 06
IMG

विजय वडेट्टीवार यांच्या या विधानावरुन राजकारण तापले आहे.

मुंबई, दि. ६ : आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले आहे”, असे विधान वडेट्टीवार यांनी केले. त्यानंतर पुन्हा या विधानावर स्पष्टीकरण देताना वडेट्टीवार म्हणाले, “आपण हे एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला देऊन बोललो आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई दहशवादी हल्ला प्रकरणी न्यायालयामध्ये जे पुरावे सादर करायला हवे ते उज्ज्वल निकम यांनी सादर केले नाही”, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विजय वडेट्टीवार यांच्या या विधानावरुन राजकारण तापले आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघामधून भाजपाने उज्ज्वल निकम यांना लोकसभेचे तिकीट दिलेले आहे.

Share: