IMG-LOGO
महाराष्ट्र

गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडेंकडून गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

Saturday, Dec 12
IMG

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमितेताने गोपीनाथ गडावर आज भजनाचादेखील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंकजा मुंडे सहभागी झाल्या.

बीड, दि. १२ डिसेंबर : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज गोपीनाथ गड विविध प्रकारच्या फुल माळांनी व विद्युत रोषणाईने सजला होता. यंदा कोरोनामुळे दरवर्षी सारखा मोठा कार्यक्रम नव्हता आज सकाळपासूनच जिल्हयासह राज्यभरातील हजारो कार्यकर्त्यांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. अतिशय शिस्तबद्ध वातावरणात सर्वांनी लोकनेत्याला अभिवादन केले. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे कुटुंबासह परळी येथील गोपीनाथ गडावर दाखल झाल्या. त्यांनी वडील गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केलं.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांना व्हिडीओ मेसेजद्वारे आवाहन करत रक्तदान शिबिरं आयोजित करण्याचंही आवाहन केलं. "12 डिसेंबर हा आपल्या सर्वांना उर्जा देणारा दिवस आहे. गोपीनाथ मुंडे संघर्षाचं मुर्तीमंत मोठं उदाहरण होतं. आज ते आपल्यात नाही तरीही ते आपल्यासाठी संघर्षाचा महामेरु आहेत. लोकांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देणारं ते नेतृत्व आहे. गोपीनाथ गडाच्या निर्मितीनंतर 12 डिसेंबर आणि 3 जून हे दिवस आपण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करतो. या दिवशीच्या कार्यक्रमांना मुख्यमंत्र्यांपासून मोठमोठे नेते आणि सामाजिक क्षेत्रातील नेते उपस्थित राहिले. छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे असे दोन्ही छत्रपती गोपीनाथ गडावर आले." असे पंकजा मुंडे यांनी म्हंटले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमितेताने गोपीनाथ गडावर आज भजनाचादेखील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंकजा मुंडे सहभागी झाल्या. हातात टाळ घेऊन पंकजा यादेखील भजनात तल्लीन झाल्या.

Share: