IMG-LOGO
क्रीडा

भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Wednesday, Dec 09
IMG

८ ऑगस्ट२००२ मध्ये कसोटी सामन्यापासून त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले होते. इंग्लंड विरुद्ध सामन्यापासून त्याच्या करिअरला सुरुवात झाली होती.

अहमदाबाद, दि, ९ डिसेंबर : भारताचा डावखूरा क्रिकेटपटू पार्थिव पटेलने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निववृत्ती जाहीर केली आहे. पार्थिव पटेलने ट्विट करत माहिती दिली. वयाच्या ३५ व्या वर्षी पार्थिवने निवृत्ती जाहीर केली आहे. पार्थिवने जेव्हा भारतीय संघाकडून कसोटीत पदार्पण केले होते तेव्हा तो सर्वात कमी वयाचा विकेटकिपर होता.८ ऑगस्ट२००२ मध्ये कसोटी सामन्यापासून त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले होते. इंग्लंड विरुद्ध सामन्यापासून त्याच्या करिअरला सुरुवात झाली होती. तर २४ ऑगस्ट २०१८ मध्ये आफ्रिकेविरुद्ध  शेवटचा कसोटी सामना खेळला. तर ४ जानेवारी २००३ मध्ये त्याने न्यूझीलंड विरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला आणि २१फेब्रुवारी २०१२ मध्ये श्रीलंके विरुद्ध अंतिम एकदिवसीय सामना खेळला. यानंतर आयपीएलमध्ये पार्थिव पटेलला चांगली संधी मिळाली. एकूण २५ कसोटी सामन्यात ९३४ धावा केल्या आहेत ज्यामध्ये ६ वेळा अर्धशतक ठोकले आहे. एकदिवसीय कारकिर्दीत ३८ सामने खेळले आहेत ज्यामध्ये ४ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच २ आंतरराष्ट्रीय टी-20 सामने तो खेळला आहे. त्यासोबतच आयपीएलच्या१३९ सामन्यात त्याने २८४८ धावा केल्या आहेत ज्यामध्ये १३ अर्धशतकांचा समावेश आहे.

Share: