IMG-LOGO
राष्ट्रीय

PM MODI 3.0 : मंत्र्यांची ही टीम तरुण आणि अनुभवी : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Monday, Jun 10
IMG

मोदींनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दिल्ली, दि. १० :  नरेंद्र मोदींनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासह जवळपास ६० हून अधिक कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्र्यांनीही शपथ घेतली. त्यामुळे Modi 3.0 चं मंत्रीमंडळ आता तयार झालं असून आता सरकारच्या कामगिरीवर सगळ्यांचं लक्ष असेल. शपथविधी पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर पोस्ट करत आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.काय आहे नरेंद्र मोदींच्या पोस्टमध्ये?पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी सहकारी मंत्र्यांचं अभिनंदन केलं आहे. “आज ज्यांनी शपथ घेतली, त्या सगळ्यांचं अभिनंदन. मंत्र्यांची ही टीम तरुण आणि अनुभवी सहकाऱ्यांची खूप छान अशी सांगड आहे. लोकांच्या आयुष्यात सुधारणा आणण्याचे प्रयत्न करण्यात आम्ही अजिबात कसर सोडणार नाही”, असं मोदींनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Share: