अंदाजे 50 वर्ष वयाचा एक अनोळखी इसम गेवराईहून अंबडला जाण्यासाठी एसटीमध्ये बसला.
जालना, दि. ४ जानेवारी : गेवराई येथून एसटीमधून प्रवास करीत असताना एका अनोळखी इसमाने बसमध्येच विष प्राशन केल्याचा केल्याची खळबळजनक घटना घडली. उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात या प्रवाशाची प्राणज्योत मालवली असून त्याची ओळख मात्र अद्याप पटू शकलेली नाही. अंदाजे 50 वर्ष वयाचा एक अनोळखी इसम गेवराईहून अंबडला जाण्यासाठी एसटीमध्ये बसला. बस अंबड जवळ पोचत असताना बसमध्ये दुर्गंधी येत असल्याची व एक प्रवाशी गंभीर असल्याचे प्रवाशांनी चालक आणि वाहकांच्या निदर्शनास आणून दिले. तेव्हा त्या प्रवाशाने विष प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केला असल्याचे समजताच बसमध्ये एकच खळबळ उडाली. चालक आणि वाहकाने प्रवाशांच्या मदतीने या व्यक्तीला इसमास अंबड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या ठिकाणी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय येथे दाखल केले असता त्याची प्राणज्योत मालवली.