IMG-LOGO
महाराष्ट्र

कोरोनाविरुध्दच्या लढाईत पोलिस ‘फ्रंटलाईन वॉरीअर्स’ – पालकमंत्री संजय राठोड

Sunday, Oct 18
IMG

पोलिस मुख्यालयात जिल्हा पोलिस तसेच त्यांच्या कुटुंबियांकरिता निर्माण करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण करताना ते बोलत होते.

यवतमाळ, दि. १८ ऑक्टोबर : गत सात-आठ महिन्यांपासून आपण कोरोनाविरुध्दची लढाई लढत आहोत. शासन, प्रशासन, आरोग्य विभाग, पोलिस विभाग नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता तर पोलिस विभाग प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून नागरिकांना शिस्त लावण्याची जबाबदारी पार पाडत आहे. एकप्रकारे कोरोनाविरुध्दच्या लढाईत पोलिस हे ‘फ्रंटलाईन वॉरीअर्स’ आहेत, असे गौरवोद्वागार पालकमंत्री संजय राठोड यांनी काढले. पोलिस मुख्यालयात जिल्हा पोलिस तसेच त्यांच्या कुटुंबियांकरिता निर्माण करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, डॉ. मनवर आदी उपस्थित होते.

Share: