IMG-LOGO
महाराष्ट्र

पोलिसांनी संकेत बावनकुळे यांची वैद्यकीय चाचणी टाळली

Tuesday, Sep 10
IMG

दोघांसोबत संकेतला पोलिसांनी ताब्यात घेतले नाही तसेच त्याची वैद्यकीय तपासणीसुद्धा केली नाही.

नागपूर, दि. १०  : रविवारी मध्यरात्री नागपूरच्या सीताबर्डी भागात एका ऑडी कारनं काही वाहनांना धडक दिली. यामध्ये कुणीही गंभीर जखमी झालेलं नाही. मात्र, वाहनांचं नुकसान झालेलं आहे. या प्रकरणाचं सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावरून बरीच चर्चा सुरू झाली आहे. ही कार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळे यांच्या मालकीची असल्याचं स्पष्ट झालं आहे. आधी कारची नंबरप्लेट काढून ठेवल्याचं दिसून आलं. मात्र, नंतर ही नंबरप्लेट कारमध्येच असल्याचं पोलिसांना आढळून आलं. आता या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे.  कारचालक अर्जून हावरे आणि रोनित चिंतमवार या दोघांना सीताबर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांचीही वैद्यकीय चाचणी केली असता दोघेही मद्य प्यायलेले आढळले. मात्र, त्या दोघांसोबत संकेतला पोलिसांनी ताब्यात घेतले नाही तसेच त्याची वैद्यकीय तपासणीसुद्धा केली नाही.अपघात झाला त्यावेळी संकेत बावनुकळे कारमध्येच होता. मात्र, सीताबर्डी पोलिसांनी अर्जून हावरे आणि रोनित चिंतमवार यांनाच ताब्यात घेतले. संकेतला सूट देण्यात आली. पोलिसांनी एकदाही संकेत कारमध्ये होता, हे स्पष्ट केले नाही. संकेतला मित्रांनी घरी सोडले. त्यानंतर कार सीताबर्डी पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आली. सोमवारी रात्री संकेत बावनकुळे याला सीताबर्डी पोलिसांनी ठाण्यात आणले. त्याची सविस्तर चौकशी केली. त्याने चालक अर्जूनच्या बाजूच्या सीटवर स्वतः बसलेला होतो, अशी कबुली दिली.

Share: