सामन्यात पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सवर ४ विकेट्सने विजय मिळवला आहे.
मुल्लनपूर, दि. २४ : आयपीएल 2024 मध्ये दुसरा सामना शनिवारी पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सवर ४ विकेट्सने विजय मिळवला आहे.पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. सुरुवातील फलंदाजीत दिल्लीचा संघ संघर्ष करत असल्याचे दिसत होत, मात्र २०वे षटक टाकायला आलेल्या हर्षल पटेलच्या षटकात अभिषेक पोरेलने २५ धावा देत दिल्लीला १७४ धावांपर्यंत नेले. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने वेगवान सुरुवात केली. एका टोकाकडून विकेट पडत राहिल्या, पण सॅम करन दमदार अर्धशतक झळकावून पंजाब किंग्जला ४ गडी राखून विजय मिळवून दिला. दिल्ली कॅपिटल्सकडून फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नरने २९ , मिचेल मार्शने २०, रिषभ पंतने १८, शे होपने ३३, अक्षर पटेलने २१, अभिषेक पोरलने ३२ धावा केल्या तर इतर फलंदाजांना दोन अंकी धाव संख्या देखील करता आली नाही. पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी २० ओव्हरमध्ये ९ विकेट्स घेतल्या.