आरसीबीने कधीही आयपीएलचे विजेतेपद पटकावले नव्हते, परंतु महिला संघाने केवळ दोन हंगामात पहिले विजेतेपद पटकावले आहे. एलिस पेरीने आरसीबीकडून ऑरेंज कॅप जिंकली आहे.
दिल्ली, दि. १८ : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने महिला प्रीमियर लीग २०२४ च्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरूध्द झालेल्या सामन्यात आरसीबीने आठ गडी राखून विजय मिळवला. फायनलमधील या विजयासह आरसीबी संघाने आयपीएल आणि महिला प्रीमियर लीगमध्ये मिळून पहिल्यांदाच जेतेपद जिंकले आहे. विराट कोहलीनेही सर्व संघाचे व्हिडिओ कॉल करून अभिनंदन केले आहे.आरसीबीने कधीही आयपीएलचे विजेतेपद पटकावले नव्हते, परंतु महिला संघाने केवळ दोन हंगामात पहिले विजेतेपद पटकावले आहे. एलिस पेरीने आरसीबीकडून ऑरेंज कॅप जिंकली आहे. तिने डब्ल्यूपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. याशिवाय श्रेयंका पाटीलने आरसीबीसाठी अप्रतिम कामगिरी करत स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. याच कारणामुळे तिला पर्पल कॅप मिळाली आहे. उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कारही श्रेयंकाच्या खात्यात गेला आहे. सोफी मोलिनक्स अंतिम सामन्यात आरसीबीसाठी शानदार गोलंदाजी करताने एका षटकात तीन विकेट्स घेत सामन्याची बाजू पलटली. तिने चार षटकात २० धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. तिला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.