आता आरटीई 24 टक्के राखीव जागांसाठी नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
मुंबई, दि. १७ : अखेर आरटीई प्रवेश प्रक्रियेचा मुहूर्त लागला असून आरटीई प्रवेश प्रक्रियेला आजपासून नव्याने सुरुवात होणार आहे. पालकांना 17 मे ते 31 मेपर्यंत आरटीईसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज भरलेल्या पालकांनाही नव्याने आपल्या पाल्यांचा अर्ज भरावा लागणार आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत एक लाखांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. आता आरटीई 24 टक्के राखीव जागांसाठी नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे. ज्या पालकांनी यापूर्वी त्यांच्या पाल्यांची आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केली आहे, त्यांनाही पुन्हा नोंदणी करावी लागणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी यांनी सांगितलं.