IMG-LOGO
महाराष्ट्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्वबळाची तयारी, राज ठाकरे यांचे संकेत; २०० ते २२५ जागा लढवणार

Thursday, Jun 13
IMG

पक्ष संघटन वाढीसाठी सर्वांना अथक प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबई, दि. १३ : महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळाची तयारी करत असल्याचं चित्र आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट 'दोनशे पार'चा नारा दिला आहे. आपण २०० ते २२५ जागांवर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करायची आहे, असं राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितलं. विधानसभेच्या तयारीला लागण्याच्या सूचनाही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राज्यातील सर्व जागांवर तयारी करण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा नरेंद्र मोदी यांच्यासाठी राज ठाकरे यांनी दिला असला, तरी विधानसभेला मात्र वेगळा मार्ग निवडतात का? याकडे लक्ष आहे. राज ठाकरेंनी मनसेच्या नेत्यांना मतदारसंघांचं वाटप केलं आहे. वरळीत राज ठाकरेंच्या वाढदिवसाचे पोस्टर संदीप देशपांडे यांनी लावल्याने ते आदित्य ठाकरेंविरुद्ध या मतदारसंघातून उतरणार असल्याची चर्चा आहे. तर बाळा नांदगावकर शिवडीतून लढण्याची चिन्हं आहेत. झालेलं मतदान हे मराठी माणसाचं मतदान नाही. त्यांना वाटत असेल की, आपल्याला मतदान झालं आहे. मात्र, तसं झालेले नाही. उद्धव ठाकरेंना जे मतदान झालं आहे ते मोदी विरोधातील मतदान झालं आहे. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दलही राग आहे. त्यामुळे जनता मनसेची वाट पाहत आहे. 200 ते 225 जागांवर आपण तयारी करत आहोत. महायुती असो किंवा महाविकास आघाडी असेल,  यांच्यातच काही जागावाटप ठरत नाही. मी सुद्धा जागा मागायला जाणार नसल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी काही सूचना केल्या. तसेच मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी टीम सुद्धा तयार केला जाणार आहे. या टीम राज्यभर मतदारसंघनिहाय आढावा घेणार आहेत. यामध्ये पक्ष संघटन वाढीसाठी सर्वांना अथक प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

Share: