विधानसभा निवडणुकीत महायुतीला १७० पर्यंत जागा मिळतील', असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई, दि. १ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात रामदास आठवले यांच्यासारखा मंत्री होण्यापेक्षा माझा पक्ष बंद करेल, असे म्हटले होते. यावर रामदार आठवले यांनी मी आता मंत्री झालो असून राज ठाकरेंनी आपला पक्ष बंद करावा, अशी प्रतिक्रिया दिली आहे.'महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात मुख्य लढत असली तरी ही निवडणूक महायुतीसाठी अत्यंत सोपी आहे. लोकसभेत खोट्या नरेटीव्हमुळे महायुतीला नुकसान सहन करावे लागले. परंतु, विधानसभा निवडणुकीत महायुतीला १७० पर्यंत जागा मिळतील', असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.