IMG-LOGO
मनोरंजन

मराठीतला रणवीर सिंह, अभिजीत खांडकेकरचा हटके लुक

Tuesday, Jul 13
IMG

अभिजीतने एक रंगीबेरंगी जर्किन घातला आहे. त्याच्याखाली त्याने मुलींच्या प्लाजोला मिळतीजुळती पॅन्ट परिधान केली आहे.

मुंबई, दि. १३ जुलै : अभिनेता रणवीर सिंगचं नाव सर्वात आधी हटके लुकमुळे चर्चेत  येतं. तो नेहमीच आपल्या हटके लुकमुळे चर्चेत असतो. रणवीरसारखंचं मराठीमध्ये अभिनेता अभिजीत खांडकेकरने असा हटके फंडा वापरला आहे.अभिजीतने एक रंगीबेरंगी जर्किन घातला आहे. त्याच्याखाली त्याने मुलींच्या प्लाजोला मिळतीजुळती पॅन्ट परिधान केली आहे. अभिजीतच्या या हटके लुकवरून नेटकर्यांनी मराठीतला रणवीर सिंह अशी उपमा दिली आहे. अभिजीत ‘क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची’ या शोचं सूत्रसंचालन करत असून चाहत्यांची त्याला मोठी पसंती मिळते आहे. अभिनेता अभिजीत खांडकेकर नेहमीच आपल्या अभिनयामुळे तर चर्चेत असतोच. मात्र अलीकडे तो आपल्या स्टाईलमुळेसुद्धा चर्चेत असतो. स्त्री आणि पुरुषांचे कपडे विभागू नयेत असं मतही व्यक्त केल होतं. त्यांनतर आत्ता पुन्हा एकदा अभिजीतने एक हटके लुक केला आहे.

Share: