स्फोटकांचा मुद्दा येतो तिथे एनआयए तपास करतेच. या प्रकरणात जो कोणी दोषी असतील, त्यांना तपास यंत्रणा शोधून काढतीलच. एनआयए आणि एटीएस प्रोफेशनल एजन्सी आहे.
गृहंत्री देशमुख यांची माहिती; चौकशीत बाधा टाळण्यासाठी बदल्यामुंबई, दि. १८ मार्च : मुंबई पोलीस आयुक्तांची बदली ही रुटीन नाही. चौकशीमध्ये काही गोष्टी समोर आल्या त्या अक्षम्य आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि आम्ही बसून निर्णय घेतला, की चौकशीमध्ये कोणतीही बाधा येऊ नये, यासाठी त्यांना बाजूला केले, असं स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. विरोधी पक्ष इथून तिथून माहिती घेते. गृहखाते तीन पक्ष चालवतात असे म्हटले जाते, या आरोपावर देशमुख म्हणाले, की मी गृहमंत्री आहे. बदल्यांचा विषय येतो तो निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून होतो. एनआयए आणि एटीएसमार्फत तपास सुरू आहे, त्यांच्या माध्यमातून ही बाब समोर आली. मुंबई पोलिस प्रमुख म्हणून त्यांच्या कार्यालयातून, त्यांच्या सहकार्यांमार्फत अक्षम्य चुका झाल्या. त्या माफ करण्यासारख्या नाहीत, म्हणून बदलीचा निर्णय घेतला. महाराष्ट्र पोलिस, मुंबई पोलिसांची जगात ख्याती आहे. काही पोलिस अधिकार्यांनी चुका केल्या, तपासात जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होणार आहे, असे त्यांनी सांगितले. स्फोटकांचा मुद्दा येतो तिथे एनआयए तपास करतेच. या प्रकरणात जो कोणी दोषी असतील, त्यांना तपास यंत्रणा शोधून काढतीलच. एनआयए आणि एटीएस प्रोफेशनल एजन्सी आहे. त्या दोषींना शोधून काढणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मी मुख्यमंत्री असताना 2018 मध्ये वाझे यांना सेवेत परत घेण्यासाठी शिवसेनेचा दबाव होता, असा दावा विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवी यांनी नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केला. त्याविषयी विचारले असता देशमुख म्हणाले, की एपीआय दर्जाच्या अधिकार्याला सेवेत आणण्यासाठी कमिशनर स्तरावर समिती आहे. ती समिती त्याचा निर्णय घेते. ही समिती आढावा घेऊन त्यांना सेवेत सामील करून घेण्याचे ठरविते. त्यानुसार वाझे पोलिस दलात परतले.फडणवीस यांचा आरोप राजकीय आहे. त्यांनाही हे माहीत आहे, या फाईल सरकारकडे येत नाहीत, समितीकडे ही फाईल येते. वाझे यांच्यासारख्या एपीआय दर्जाच्या अधिकार्याला सेवेत परत घेण्याचा अधिकार ना मला आहे, ना मुख्यमंत्र्यांना. तो अधिकार आयुक्त स्तरावरील समितीला आहे.