अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणाच्या चौकशी दरम्यान ड्रग्ज सिंडीकेट प्रकरणात एनसीबीने तिला ताब्यात घेतले होते.
मुंबई, दि. २२ सप्टेंबर : ड्रग्ज रॅकेट प्रकरणात रिया चक्रवर्ती हिच्या न्यायालयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. रियाची न्यायालयीन कोठडी आज संपली. तिला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणाच्या चौकशी दरम्यान ड्रग्ज सिंडीकेट प्रकरणात एनसीबीने तिला ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. रिया आणि शौविकने आज हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.