रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या टीमने आतापर्यंत ४ मॅचेस खेळल्या असून त्यापैकी ३ मचेसमध्ये विजय मिळवत ६ पॉईंट्ससह पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांकावर पोहोचली आहे.
अबुधाबी, दि. ०३ ऑक्टोबर : देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार विराट कोहलीने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने राजस्थान रॉयल्सचा ८ विकेट्सने पराभव केला आहे. राजस्थानच्या संघाने विजयासाठी दिलेले १५४ धावांचे आव्हान २ गडी गमावून पूर्ण केले. बंगळुरू कडून कर्णधार विराट कोहली याने नाबाद ७२ तर तरुण खेळाडू देवदत्त पडीकल याने ६३ धावांचे योगदान दिले. या विजयासह बंगळुरूचा संघ गुणतालिकेत नंबर वनवर पोहोचला आहे.या मॅचमध्ये राजस्थानने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण बैंगलोरच्या बॉलरनी केलेल्या अचूक माऱ्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या टीमने आतापर्यंत ४ मॅचेस खेळल्या असून त्यापैकी ३ मचेसमध्ये विजय मिळवत ६ पॉईंट्ससह पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांकावर पोहोचली आहे. तर मुंबई इंडियन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे.