राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आज थोडक्यात बचावल्या आहेत. गायकवाड यांच्या गाडीच्या मागच्या बाजूला घासले गेले आहे
हिंगोली दि १० : राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आज थोडक्यात बचावल्या आहेत. हिंगोली दौऱ्यावर असताना त्यांच्या वाहनाला टेम्पोने धडक दिली. त्यांच्या वाहन चालकाने प्रसंगावधान राखत वाहनाची गती वाढवल्याने अपघात टळला. गायकवाड यांच्या गाडीच्या मागच्या बाजूला घासले गेले आहे.