IMG-LOGO
महाराष्ट्र

चोरांना पाहून पोलिसच पळाले!

Tuesday, Dec 29
IMG

पुणे शहराच्या औंधमधील सिद्धार्थनगर भागातील शैलेश टॉवर सोसायटीमध्ये 28 डिसेंबर रोजी ही घटना घडली. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चार चोरटे धारदार शस्त्र घेऊन सोसायटीत घुसले.

पुणे, दि. २९ डिसेंबर :  राज्याची सांस्कृतिक नगरी असलेल्या पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. औंध परिसरात चोरांनी एका घरावर दरोडा टाकला; परंतु जेव्हा पोलिस दारावर पोहोचले, तेव्हा चोरांना पाहून त्यांनीच घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.पुणे शहराच्या औंधमधील सिद्धार्थनगर भागातील शैलेश टॉवर सोसायटीमध्ये 28 डिसेंबर रोजी ही घटना घडली. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चार चोरटे धारदार शस्त्र घेऊन सोसायटीत घुसले. सोसायटीत शिरल्यानंतर दोघांनी पहारेक-याला चाकू दाखवला व पकडून ठेवले, त्यानंतर दोन जणांनी वर जाऊन कटरच्या सह्याने फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. रात्री अचानक आवाज झाल्यामुळे चोर आला आहे हे लक्षात आले. सोसायटीमधील एका व्यक्तीने तात्काळ पोलिसांना फोन केला. थोड्याच वेळात पोलिस हजरही झाले. त्यांनी चोरांना आलेले बघितलेही; पण पोलिसांनी स्वतःकडे बंदूक असतानाही त्यांना पकडण्याचा प्रयत्न करण्याऐवजी पोलिसच पळून गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले.बंद असणा-या चार सदनिकांची कुलुपे चोरांनी तोडली व एका सदनिकेचे कुलूप तोडत असताना लोकांचा आवाज ऐकून चोरटे पळू लागले. पाचव्या घराचे कुलूप तोडण्यात त्यांना अपयश आले; पण सुदैवाने बंद सदनिकेत कोणीही राहत नसल्याने त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. चोरट्यांनी जाताना फक्त एका घरातील एलईडी टीव्ही चोरला. पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन, स्वतः कडे बंदूक असूनही एक पोलिस गाडीवरून पळून जाताना सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे.

Share: