पोलिसांनी धक्काबुक्की केल्यानंतर तसेच राहुल गांधी यांची कॉलर पकडून त्यांना अटक केल्यानंतर देशासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई दि.०१ ऑक्टोबर : उत्तर प्रदेशमधील हाथरसमधील बलात्कार पीडित युवतीच्या कुटुंबियांना काँग्रेस नेते राहुल गांधी भेट घेण्यासाठी चालले होते. मात्र युपी पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की करत अटक केली आहे. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींसोबत केलेले वर्तन हे अत्यंत निंदनीय आहे. अशा पद्धतीने लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. कायदा हातात घेतला जात असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.शरद पवारांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींसोबत केलेले वर्तन हे अत्यंत निंदनीय आहे. अशा पद्धतीने लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत आणि कायदा हातात घेतला जातोय.' दरम्यान,राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते देखील पायी प्रवास करत होते. मात्र पोलिसांनी धक्काबुक्की केल्यानंतर तसेच राहुल गांधी यांची कॉलर पकडून त्यांना अटक केल्यानंतर देशासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.